स्वागत काव्यसंग्रहाचे चिंचवडमध्ये प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वागत काव्यसंग्रहाचे 
चिंचवडमध्ये प्रकाशन
स्वागत काव्यसंग्रहाचे चिंचवडमध्ये प्रकाशन

स्वागत काव्यसंग्रहाचे चिंचवडमध्ये प्रकाशन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः काळेवाडी येथील ज्येष्ठ कमी तानाजी एकोंडे यांच्या ‘स्वागत’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण होत्या. अशोकमहाराज गोरे, नंदकुमार मुरडे, रघुनाथ पाटील, डॉ. पी. एस. आगरवाल, प्रदीप गांधलीकर, अनिता पांचाळ, अंतरा देशपांडे, प्रा. तुकाराम पाटील आदी उपस्थित होते. ‘‘जीवनातील संघर्षांना स्वीकारावेच लागते. त्यांच्याशी झुंज देत जगावे लागते. असे असतानाही इतरांशी संवाद साधावा लागतो, तो साहित्यातून उतरतो,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. उत्तमराव दंडिमे यांनी वेद, पुराणशास्त्र आणि भगवद्गीतेतील संदर्भ देऊन काव्याची महती सांगितली. राधाबाई वाघमारे यांनी स्वागत काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले. शामला पंडित यांनी प्रास्ताविक केले. दिलीप कुलकर्णी यांनी आभार मानले.
--