राजीव गांधी विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजीव गांधी विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम
राजीव गांधी विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम

राजीव गांधी विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : नेहरूनगर येथील महापालिकेच्या राजीव गांधी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगत संस्था यांच्या वतीने मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. सीए अरविंद भोसले म्हणाले, ‘‘कुठल्याही क्षेत्रातील यशस्वी झालेल्या व्यक्तींना आयडॉल बनवून त्यांच्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करा. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मोफत सुविधा दिल्या जातात. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा उपयोग उज्वल भविष्यासाठी करावा. महापालिकेद्‍वारे मिळणारे एक लाखाचे पारितोषिक मिळवण्यासाठी ९० टक्के गुण प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा. व उज्वल यश संपादन करावे.’’ यशस्वी क्लासेसचे संचालक किरण कांबळे, राजीव गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एम.जी गुंजेगांवकर, सांगत संस्थेच्या अधिकारी अर्चना चिंचने, राजश्री कंतांगे, प्रदीप म्हस्के, शिक्षिका वैशाली शेलार, शिक्षिका नंदा सोणकर उपस्थित होते. प्रदीप म्हस्के, अर्चना चिंचने यांनी मनोगत व्यक्त केले.