किवळे-खंडाळा अपघातांची संख्या घटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किवळे-खंडाळा अपघातांची संख्या घटली
किवळे-खंडाळा अपघातांची संख्या घटली

किवळे-खंडाळा अपघातांची संख्या घटली

sakal_logo
By

सोमाटणे, ता. २१ः कॅमेऱ्याच्या नजरेमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील किवळे ते खंडाळा दरम्यान अपघातांची संख्या घटली तर मृत व जखमींची संख्या वाढली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लेन कटिंग, डुलकी लागणे व वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याने अपघात होत होते, यात किवळे ते खंडाळा दरम्यान पुणे विभागाच्या हद्दीत किवळे पूल, ओझर्डे, बऊर, कुसगाव दरम्यानचा रस्ता हा अपघातग्रस्त रस्ता होता. पूर्वी सर्वाधिक अपघात हे बऊर ते ओझर्डे दरम्यान झाले होते. हे अपघात कमी
करण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने रस्ते विकास महामंडळाच्या वतीने अपघातग्रस्त ठिकाणी व महामार्ग पोलिसांच्या वाहनात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही
कॅमेरे बसवण्यात आले. या कॅमेऱ्याची नजर नियम मोडणाऱ्या वाहनावर असल्याने दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची वेळ वाहन चालकावर आली. परिणामी गेल्या वर्षभरापासून वाहनांची संख्या वाढूनही वाहन चालकांचा कल वाहतूक नियमाचे पालन करण्याकडे वाढला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात किवळे ते खंडाळा दरम्यान अपघाताची संख्या घटली आहे.
चौकटः
एक जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ अखेर एकूण ३२ अपघात घडले असून यात ४० जणांचा मृत्यू झाला तर १३० जण जखमी झाले.
गेल्या वर्षी, वर्षभरात एकूण ४२ अपघात झाले होते. यात ४० जणांचा मृत्यू झाला तर १३० जखमी झाले होते.
वरील आकडेवारीवरून यावर्षी अपघाताची संख्या घटली तर मृत्यू व जखमींची संख्या वाढली.