ॲडवांसेस इन कॉम्पुटर सायन्सची राष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲडवांसेस इन कॉम्पुटर सायन्सची राष्ट्रीय परिषद
ॲडवांसेस इन कॉम्पुटर सायन्सची राष्ट्रीय परिषद

ॲडवांसेस इन कॉम्पुटर सायन्सची राष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : एम. एम पॉलिटेक्निक पिंपरी-चिंचवड आणि एआयसीटीई नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ॲडवांसेस इन कॉम्पुटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग(एनसीएसीएस इ २०२२) या राष्ट्रीयस्तरीय परिषदेचे (आभासी) आयोजन करण्यात आले होते. नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि त्याची उत्कृष्टरीत्या मांडणी करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी जोपासावे असा स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती प्राचार्या गीता जोशी यांनी दिली. स्पर्धेसाठी एआयसीटीई दिल्ली केंद्रीय बोर्डाकडून निधी मिळाला होता. स्पर्धेत जवळपास ९६ संघानी सहभाग नोंदविला होता. त्यामधून ६ स्पर्धक संघाची विविध गटातून विजेते म्हणून निवड झाली. त्याचे पारितोषिक वितरण प्राचार्यांच्या हस्ते आणि विभागप्रमुख व्ही.ए.सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेसाठी आयोजक म्हणून आरती देशमुख यांनी काम पहिले. तसेच, संगणक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे कार्याध्यक्ष बी.जी.जाधव यांनी परिषदेच्या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.