ताथवडेत सांडपाणी रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताथवडेत सांडपाणी रस्त्यावर
ताथवडेत सांडपाणी रस्त्यावर

ताथवडेत सांडपाणी रस्त्यावर

sakal_logo
By

पुणे-मुंबई महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ताथवडे येथील सेवा रस्त्यावर सांडपाणीवाहत असल्याने येथील नागरिकांसह छोटे-मोठे व्यावसायिक, शाळा, महाविद्यालयामधील सर्वच वयोगटातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. येथील सेवा रस्त्यावर अनेक चेंबर भरून वाहत आहेत. हा रस्ता अतितीव्र असल्याने वाहणारे पाणी सर्वदूर पसरत आहे. त्यामुळे हा रस्ता निसरडा झाला आहे. या चेबंरमधील घाण पाण्यामुळे येथील व्यावसायिकांच्या ग्राहकांवर परिणाम झाला असून ग्राहक त्यांच्याकडे फिरकानेसे झाले आहेत.
- प्रदीप गायकवाड, पिंपरी