धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धर्मांतर बंदी कायदा
लागू करण्याची मागणी
धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी

धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : ‘‘महाराष्ट्रात हिंदुत्वाचा सन्मान करणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हिंदू बांधवांना अपेक्षीत असलेला गो-हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच, लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा,’’ अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गो-हत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरासारख्या हिंदू धर्मविरोधी प्रवृत्ती बळावल्या आहेत. महाराष्ट्रात गो-हत्या बंदी कायदा आपल्या सरकारच्या काळात लागू करण्यात आला. मात्र, अद्याप अवैधरीत्या गो-वंश संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. लव्ह जिहादसारख्या घटनांमुळे हिंदू मुली असुरक्षित आहेत. दुसरीकडे भूलथापा करून धर्मांतर करून हिंदू बांधवांवर अन्याय-अत्याचार करण्यात येत आहे.
हिंदू धर्मविरोधी आणि लव्ह जिहादसारख्या विकृती विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने १८ डिसेंबर २०२२ रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हिंदू जनगर्जना’ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सुमारे २५ हजारहून अधिक हिंदू बांधव रस्त्यावर उतरले. हिंदू धर्म रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या विचारांचे संवर्धन करण्यासाठी हा प्रातिनिधिक मोर्चा काढला होता. याचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

‘‘देशात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गो-हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करून हिंदू धर्म आणि हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी तमाम हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करून आण गो-हत्या बंदी, लव्ह जिहाद आणि धर्मांतराबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी आहे.’’
- महेश लांडगे, आमदार