विद्येच्या प्रांगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्येच्या प्रांगणात
विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

sakal_logo
By

विद्येच्या प्रांगणात ः शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रम

नाताळ, स्नेहसंमेलन, प्रदर्शन, स्पर्धा उत्साहात

पिंपरी ः एच. ए. स्कूल (माध्यमिक विद्यालय) पिंपरी प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अजय शिर्के उपस्थित होते. या वेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. शरद आगरखेडकर, स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष राजू गायकवाड, पालक शिक्षक संघ सहसचिव शारदा दातीर, श्वेता नाईक व विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक दीक्षित व संविधान आरकडे उपस्थित होते. बहुआयामी विद्यार्थ्यांचा माणिकराव दिघे व सीताबाई दिघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वार्षिक पारितोषिक वितरणाच्या निमित्ताने माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थी, पाचवी ते दहावीतील वार्षिक परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी बाह्य परीक्षा, नेतृत्व क्रीडा यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांनी केले. रूपाली माने यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली. दीपा अभ्यंकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सूत्रसंचालन सुषमा निरगुडकर यांनी केले. आभार उपकार्याध्यक्ष श्वेता नाईक यांनी मानले.

नाताळ उत्साहात
नाताळ सणानिमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा चिंचवड स्टेशन पिंपरी-चिंचवड महापालिका व विपला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल आनंद’ मेळावा घेतला. या मेळाव्याचे उद्‍घाटन मुख्याध्यापिका अलका वाबळे यांनी केले. फलक लेखन शाळेतील उपशिक्षीका सुनीता दहिफळे यांनी केले. बाल मेळाव्याचे प्रास्ताविक संगीता डॉले यांनी केले. आभार विप्ला फाउंडेशनचे संदीप जोरवर यांनी केले. बाल मेळाव्यात विद्यार्थी पालक व शिक्षक सहभागी झाले होते. विपला फाउंडेशनचे प्रमुख सोमनाथ हुचगोळ, ॲकॅडमिक फॅसिलिटेटर् संदीप जोरवर, शिक्षण सहयोगी अर्चना तेजनकर, शाहीन परवेझ, बालवाडी मेंटर भारती अहिरे आणि शिक्षक लखन कसबे यांनी फलक लेखन केले.

कला व विज्ञान प्रदर्शन
एच. ए. स्कूल माध्यमिक स्कूल पिंपरी प्रशालेत भरविण्यात आलेल्या ‘कला व विज्ञान प्रदर्शनास प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.सिरिल क्रास्टो यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मिलिंद कांबळे, शालेय समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी व शास्त्रज्ञ नचिकेत जोशी, शिक्षक प्रतिनिधी राजू गायकवाड, उपकार्याध्यक्ष श्वेता नाईक व विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक दीक्षित, संविधान आरकडे उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी ‘आपले शहर जाणून घेऊया’ या उपक्रमांतर्गत ‘अर्बन आउटकम फ्रेमवर्क २०२२’ जनजागृती रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र राज्यात प्रथम पारितोषिक मिळालेले नाटक ‘द बिगिनिंग’ नाटक सादर करण्यात आले. वारकरी वेशात विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढली. प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सिरिल क्रास्टो यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. चित्रकला प्रदर्शनात १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्यक्तिचित्रे, मंडल आर्ट, राखी, मेहंदी इ. चित्रप्रकारांचा समावेश होता. रांगोळी प्रदर्शनात १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सॅलेड डेकोरेशन उपक्रमातही अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विज्ञान प्रदर्शनात मानवी मेंदूचे रचना व कार्य, प्रतिक्षिप्त क्रिया, होलोग्रॅम रेल्वे, सोलार ट्रेन, हिटर, डायलिसिस इ. उपकरणे तयार केली. २५० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. गणित प्रयोगशाळेचेही उद्‍घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान शिक्षक शिवयोगेश्वर हाविनाळ यांनी आभार मानले.

संस्कृत पाठांतर स्पर्धेत यश
दरवर्षीप्रमाणे ‘पूजनीय दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर’ स्पर्धा घेण्यात आली. विविध गटांतील विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी, उत्तम संस्कार व्हावेत. वाणी शुद्ध व्हावी हे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिशू स्तर ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत भगवद्गीता श्लोक पाठांतर, नवग्रह स्तोत्रम, भवानी अष्टकम, श्री महालक्ष्मी
अष्टकम, मधुराष्टकम पाठांतर साठी ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत पुण्यातील बहुतांश शाळांमधील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर निगडी येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी सोहम राकेश पडवेकर याने या स्पर्धेत श्री महालक्ष्मी अष्टकम सादर केले व त्यात त्याचा द्वितीय क्रमांक आला. त्याला कार्याध्यक्ष प्रा.डॉ. गजानन एकबोटे यांच्या उपस्थितीत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांच्या हस्ते संस्कृत प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. स्पर्धेसाठी मुख्याध्यापक पांडुरंग मराडे, वर्गशिक्षक कैलास माळी, रेणुका पडवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सोहमने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे व्हीजिटर राजीव कुटे, शाळा समिती अध्यक्ष चित्तरंजन कांबळे यांनी त्याचे कौतुक केले.

स्नेहसंमेलन उत्साहात
शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम शाळा निगडी येथे झलक भारत की वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी सिनेअभिनेता अभिषेक भराटे, शाळासमिती अध्यक्ष दामोदर भंडारी, शाळा समिती सदस्य पराग ठाकूर, मुख्याध्यापिका सविता बिराजदार, मुख्याध्यापक रवींद्र मुंगसे, उत्तम केंदळे, सचिन चिखले उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळी इंग्रजी माध्यम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचेअध्यक्ष भाऊसाहेब भोईर व बालकवयित्री डॉ.संगीता बर्वे होत्या. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लीना वर्तक शाळासमिती अध्यक्ष दामोदर भंडारी, श्रीरंग कुलकर्णी तसेच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनजागृती फेरी
पिंपरी चिंचवड महापालिका भोसरी कन्या शाळा क्रमांक २ याचे वतीने ईज ऑफ लिव्हिंग या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती फेरीमध्ये भक्तीशक्ती शिल्प, मोरया गोसावी प्रतिकृती, मेट्रोची सफर,स्वच्छता पर्यावरण आदी घोषवाक्ये घेऊन विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता गिते, विषय तज्ज्ञ विक्रम मोरे व शिक्षक सहभागी झाले होते.

वाघमारे, नाडे यांची निवड
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील भगवान वाघमारे व सचिन नाडे यांची वाराणसी उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या प्रौढ राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे राज्यस्तरीय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्‍थेचे मानद सचिव ॲड.राजेंद्र मुथा , सहसचिव अनिल कांकरिया, प्राचार्या सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, उमाकांत काळे, संतोष शिरसाट यांनी या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

गणित दिन उत्साहात
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत डॉ. श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी सरस्वती पूजन व रामानुजन यांची प्रतिमा पूजन करण्यात आले. संस्थेचे ऑननरी सेक्रेटरी राजेंद्र मुथा, विद्यालयाच्या प्राचार्या भारती सारंगा, हंसा लोहार, सुषमा बंब, शिक्षक प्रतिनिधी उज्वला कोळपकर, स्वाती नेवाळे उपस्थित होते. मनीषा लोखंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

13706