
फसवणूकप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पिंपरी, ता. २४ : चुकीचे मृत्युपत्र तयार करीत त्याचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, डॉ. रणजित सिंह माने, नितीन कन्हैयालाल भन्साळी, अरुणा महेंद्र आगळे, बाबू म्हेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नरेंद्र सुभाष भोईर (रा. भोईर नगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी चुकीचे मृत्युपत्र तयार केले. त्याचा वापर करून वाटणी पत्राप्रमाणे फिर्यादी वाट्याला आलेली मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने भाऊसाहेब भोईर यांच्या नावावर करून घेतली. तसेच म्हेत्रे यांनी फिर्यादी यांचे आजोबा सोपानराव भोईर यांना देण्यात येणाऱ्या सदनिकेत त्यांचा हक्क असल्याचे माहीत असताना ही सदनिका त्यांची सहमती न घेता एकट्या भाऊसाहेब भोईर यांच्या नावे करून दिली. फिर्यादी यांना हक्काने येणाऱ्या मिळकतीपासून वंचित ठेवून आर्थिक फसवणूक केली.
----------------------------
मी तीस वर्षांपासून सामाजिक,राजकीय आणि कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे माझी समाजातील प्रतिष्ठा डागाळण्याचा प्रयत्न चालू आहे. २००५ साली माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हापासून मला व माझ्या कुटुंबाला सातत्याने आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे. राजकीय हेतूने मला बदनाम करण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे. याबाबत मी कायदेशीर लढा देणार आहे. तसेच अब्रूनुकसानीबाबतही कायदेशीर लढा देणार आहे.
- भाऊसाहेब भोईर
---------------------------