
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिकांचे हास्य संमेलन उत्साहात
पिंपरी, ता. २५ ः प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ निगडी व नवचैतन्य हास्य योग परिवारातील सदस्यांचे खान्देश मराठा मंडळाच्या मैदानावर आयोजित संमेलन उत्साहात झाले.
संघाच्या अध्यक्षा चांदबी सैय्यद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, मधुमेही व समाजातील गरजूंना रुग्णोपयोगी साहित्य अल्पदरात देण्याबाबतच्या उपक्रमाची माहिती दिली. क्लबच्या प्रमुखांचा सत्कार केला. यात अलका बेल्हेकर, कुंदा एखंडे, पुष्पा नगरकर, भगवान महाजन, रामचंद्र कुंभार, शोभना जोशी, ज्ञानेश्वर खुळे यांचा समावेश होता. नाट्य, कला, योग, आरोग्य संबंधित गाणी, एकांकिका व विनोदाच्या सादरीकरणातून सदस्यांनी करमणूक केली. माऊली उद्यान, स्वानंद, दुर्गेश्वर, दादा दादी, तुकाराम बाग, गजानन बाग व रेल विहार या हास्य क्लबच्या सदस्यांचा सहभाग होता. जगन्नाथ वैद्य यांनी पोवाड्याद्वारे योगाची महती सांगितली. हास्य परिषदेचे अध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी हास्याचे महत्त्व विशद केले. नवचैतन्य हास्य संघाचे संस्थापक विठ्ठलराव काटे, रामानुंद मणियार, हरीश पाठक, दत्तात्रेय कुंडले, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, माजी महापौर आर. एस. कुमार, शर्मिला बाबर, भारती फरांदे, शैलजा मोरे, अनुप मोरे आदी उपस्थित होते. अर्चना वर्टीकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर जोशी यांनी आभार मानले. आनंदराव मुळीक, श्याम खवले, काशिनाथ पाटील, कुंदा कोळपकर यांनी संयोजन केले.
--