आकुर्डीत पोलिसांना शिवीगाळ व मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकुर्डीत पोलिसांना 
शिवीगाळ व मारहाण
आकुर्डीत पोलिसांना शिवीगाळ व मारहाण

आकुर्डीत पोलिसांना शिवीगाळ व मारहाण

sakal_logo
By

पिंपरी : पोलिसांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार आकुर्डी येथे घडला. याप्रकरणी सचिन विष्णू जगताप (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय उत्तम कदम (वय ४९, रा. कदम अपार्टमेंट, पांढरकर वस्ती, आकुर्डी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे निगडी पोलिस ठाणे येथे शिपाई पदावर कार्यरत आहेत. ते कर्तव्यावर असताना पोलिस नियंत्रण कक्षातून वायरलेसवर कॉल आला. त्याची पूर्तता करण्यासाठी फिर्यादी हे त्यांचे सहकारी पोलिस शिपाई केद्रे यांच्यासह पांढरकर वस्ती येथे गेले. यावेळी आरोपीने फिर्यादीसह केद्रे यांना शिवीगाळ केली. फिर्यादी यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मित्र असल्याचे भासवून तीन लाख रुपये उकळले
मित्राचा फोटो वापरून मित्र असल्याचे भासवत बांधकाम व्यावसायिकाकडून तीन लाख रुपये उकळले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राजेंद्र सुरेश जैन (रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल जैन, संदीप जैन, दीपक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अनिल जैन याने फिर्यादीचे मित्र अनिल जैन यांचा फोटो वापरून मोबाईलवरून फिर्यादी यांना फोन केला. त्यांना त्यांचा मित्र अनिल जैन आहे असे भासवून दिल्ली येथे अर्जंटमध्ये तीन लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्या बदल्यात आरोपी संदीप हा पुणे येथे कॅश आणून देईल, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांचा दिल्ली येथील मित्र शक्ती यांच्याकडून आरोपी दीपक याने रक्कम घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

जमिनीत खड्डा करून चोरट्याने कॉपर वायर चोरली
जमिनीत खड्डा करून दुकानात शिरलेल्या चोरट्याने सव्वा दोन लाख रुपये किमतीची कॉपर वायर चोरली. हा प्रकार पिंपळे निलख येथे घडला. याप्रकरणी गोविंद भरत सुरवसे (रा. शिंदे वस्ती, मारुंजी, ता. मुळशी, मूळ - लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे पिंपळे निलख येथे कस्पटे वस्ती ते विशालनगर या मार्गावर दुकान आहे. या दुकानाचे शटर बंद असताना जमिनीत खड्डा करून त्यावाटे आरोपी दुकानात शिरला. दुकानातील मोटार वायडिंगसाठी वापरण्यात येणारी दोन लाख २८ हजार ३०६ रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

प्रवासी महिलेचे सव्वा लाखाचे दागिने चोरीला
निगडीतील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस थांब्यावर आलेल्या प्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. हा प्रकार शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. ४५ हजार व ७५ हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळी चोरट्याने लंपास केल्या. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.