शि.प्र.मंडळी मराठी प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शि.प्र.मंडळी मराठी प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन
शि.प्र.मंडळी मराठी प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन

शि.प्र.मंडळी मराठी प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २६ ः यमुनानगर निगडी येथील शिक्षण प्रसारक मंडळीची मराठी माध्यम शाळा निगडी प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन नुकतेच झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध प्रदेश, भाषा संस्कृती यांचा समावेश होता. रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांनी कला सादर केल्या. सोशल मिडिया वापर, मोबाईलचा अतिरेक कसा कमी झाला पाहिजे? यावर आधारीत
पालक व मुलांमधील संवाद याचे पत्र वाचन यावेळी विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विवेक इनामदार, डॉ. माधवी महाजन उपस्थित होते. यावेळी शाळा समिती अध्यक्ष दामोदर भंडारी, मुख्याध्यापक रवींद्र मुंगसे, अश्विनी नामदे, मोनिका बोरसे, सांस्कृतिक प्रमुख मृणाल धसे, कविता फापाळे यांनी नियोजन केले.