
हिटींग वॉरिअर्स संघाचा क्रिकेट स्पर्धेत विजय
पिंपरी, ता. २६ ः थरमॅक्स लिमिटेड कंपनीच्या डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा टाटा मोटर्सच्या क्रिकेट मैदानावर पार पडल्या. अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात हिटींग वॉरियर्स संघाने विजय मिळविला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बी. सी. महेश (इ सी मेंबर, थरमॅक्स लि.) यांच्या हस्ते झाला. हिटींग-वॉरियर्स विरुद्ध टीबीडबल्यूइएस-फाल्कन्स या संघात सामना झाला.
हिटींग-वॉरियर्स संघाने पहिली फलंदाजी करताना १० षटकात १४५ धावा (सचिन जोशी १६, हरीश भंजन ८८, जावेद २४) १ गड्याच्या मोबल्यात केल्या. तर त्यास उत्तर देताना टीबीडबल्यूइएस-फाल्कन्स संघ फक्त ११६ धावा ( सचिन लांडगे ३०, सुजित जोग ४८, संदीप पंके २८/१ प्रमोद साबळे २८/१ ) ४ गड्यांच्या मोबदल्यात करू शकले. हिटींग-वॉरियर्स संघाने टीबीडबल्यूइएस-फाल्कन्स संघावर २९ धावाने विजय मिळवला. ही स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेस विशाल मेहरा
(हेड- डबल्यू डबल्यू एस, थरमॅक्स लि), प्रदिप वाघ व सुभाष मालुसरे उपस्थित होते. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन हरी देशपांडे, गिरीश गायकवाड, रियाझ उमवळे, सुशील मालुसरे यांनी केले.
फोटो ः 14044