
आकुर्डीतील यात्रेनिमित्त वाहतुकीत आज बदल
पिंपरी, ता. २८ : आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर हे आकुर्डी खंडोबामाळ येथे आहे. या ठिकाणी २८ ते २९ डिसेंबर २०२२ रोजी यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी अंदाजे दोन लाख भाविक दर्शनास येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, निगडी वाहतूक विभाग अंतर्गत शाखेकडून दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितले.
गुरुवारी अशी वळवणार वाहतूक...
१. थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक ही आर. डी. आगा मार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरुन खंडोबामाळ चौकाकडे न जाता, ती डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर चिंचवडमार्गे इच्छित स्थळी जातील.
२. परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक ही खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर. डी आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाउंड टी जंक्शनवरुन उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
३. चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून, सदरची वाहने ही टिळक चौक / शिवाजी चौक बाजूकडे वळून इच्छितस्थळी जातील.
४. टिळक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातून थरमॅक्स चौक बाजूकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून, सदरची वाहने सरळ चिंचवड स्टेशन / दळवीनगर मार्गे जातील.