पुणे- मुंबई महामार्गावर वाहनांची गर्दी कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे- मुंबई महामार्गावर
वाहनांची गर्दी कायम
पुणे- मुंबई महामार्गावर वाहनांची गर्दी कायम

पुणे- मुंबई महामार्गावर वाहनांची गर्दी कायम

sakal_logo
By

सोमाटणे, ता. २८ ः नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांमुळे द्रुतगती व पुणे-मुंबई महामार्गावर आज पाचव्या दिवशीही वाहनांची गर्दी कायम आहे. नाताळनिमित्त पर्यटनासाठी कोकणात व गोव्याला गेलेल्या पर्यटकांचा सुरु झालेला परतीचा प्रवास व नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटनस्थळाकडे निघालेल्या पर्यटकांमुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई महामार्गावरील वाहनांच्या रांगा आजही कायमच आहे.
द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका व पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांची संख्या वाढली तरीही टोल वसुली सुरुच होती. वाहनांच्या या गर्दीचा फटका रुग्णवाहिका व वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांना या गर्दीचा मोठा फटका बसला. अनेकजण नाताळ सुटी व नवीन वर्ष पर्यटनस्थळी साजरे करण्याचा बेत आखून, घराबाहेर पडले. तेही गर्दीच्या विळख्यात अडकले होते.

फोटो ः १४४३५
-----------------------------------------------------------------------------------------