पाच खाटांसाठी ४५०० रुपये शुल्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच खाटांसाठी ४५०० रुपये शुल्क
पाच खाटांसाठी ४५०० रुपये शुल्क

पाच खाटांसाठी ४५०० रुपये शुल्क

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः शहरातील नर्सिंग होम व रुग्णालयांची नोंदणी करताना व नोंदणीचे मुदतीनंतर नूतनीकरण करताना सुधारित दराने परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. पाच खाटांपर्यंत नियमित व त्यापुढील प्रत्येकी पाच खाटांसाठी वाढीव साडेचार हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
शहरातील नर्सिंग होम व रुग्णालयांची नोंदणी करताना व नोंदणीचे मुदतीनंतर नूतनीकरण करताना सुधारित दराने होम परवाना शुल्क आकारण्यास महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच मंजुरी दिली. त्यानुसार, महाराष्ट्र सुश्रृषागृह नोंदणी नियम २०२१ ची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या दृष्टीने शहरातील नर्सिंग होम किंवा रुग्णालयांना नोंदणी देताना व दिलेल्या नोंदणीचे विहित मुदतीनंतर नूतनीकरण करताना २०२१ -२२ या आर्थिक वर्षापासून सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात असल्याने एक ते पाच खाटांसाठी ४५०० रुपये आणि त्यापुढील पाचपेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांना वाढीव खाटांच्या टप्प्यासाठी वाढीव शुल्क भरावे लागणार आहे.

परवाना नूतनीकरण धोरण
- खासगी नर्सिंग होम किंवा रुग्णालय व्यावसायिकांनी परवाना शुल्क नियमित जमा करून नूतनीकरण करावे
- परवाना नूतनीकरण वेळेत करून घेण्यास प्रवृत्त होण्याच्या दृष्टीने विलंब शुल्क आकारण्यात येणार
- परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास पाच खाटांपर्यंत ५० व सहा खाटांपासून पुढे १०० रुपये विलंब शुल्क

असे आकारणार शुल्क
- एक एप्रिल २०२१ च्या पुढील कालावधीसाठी जुन्या दराने परवाना शुल्क स्वीकारणार
- नर्सिंग होम परवाना नोंदणी व नूतनीकरण करून सुधारित दराने परवाना शुल्क रक्कम घेणार
- नूतनीकरण परवान्याची मुदत संपुष्टात आलेल्या वर्षाच्या पुढील तीन वर्षासाठी नूतनीकरण परवाना मिळेल

असे असेल परवाना शुल्क
- एक ते पाच खाटांसाठी ः ४५०० रुपये
- पाचपेक्षा जास्त प्रचि पाच खाटांसाठी ः ४५०० रुपये
- उदाहरणार्थ पंधरा खाटा असल्यास ः १३५०० रुपये