समाजात एकत्र कुटुंब पद्धती गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजात एकत्र कुटुंब पद्धती गरजेची
समाजात एकत्र कुटुंब पद्धती गरजेची

समाजात एकत्र कुटुंब पद्धती गरजेची

sakal_logo
By

पवनानगर, ता. २९ ः ‘‘सध्याची विखरत चाललेली कुटुंबपद्धती चिंताजनक आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. खराट्याची गाठ सुटली की तो कचरा होतो. मात्र, तो एकमुठीत बांधला तर तो झाडू होवून संपूर्ण परिसर स्वच्छ करतो. त्यामुळे भावकीने एकमेकांमध्ये भांडणे न लावता एकजुटीने राहिले पाहिजे. तसेच पुन्हा एकदा एकत्र कुटुंब पद्धतीच गरजेची आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार रामराव महाराज ढोक यांनी केले.
चावसर येथे कृष्णा गोणते आणि तुकाराम गोणते यांच्या सत्कार समारंभात ढोक महाराज बोलत होते. या वेळी माउली दळवी, नवनाथ कुढले, दत्तात्रेय महाराज टेमघरे, गणेश महाराज गोणते उपस्थित होते. ढोक महाराज म्हणाले, ‘‘देवप्राप्ती सहज शक्य आहे, मात्र, संतसंग मिळणे अवघड आहे. नामातील आनंद काही निराळाच असतो. तो स्वर्गातही मिळत नाही. तो केवळ हरिनामात आहे, कीर्तन प्रवचनात आहे. मात्र, त्यासाठी योग्य गुरू मिळणे गरजेचे असते. सध्या समाजात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याला कारण आहे ती बदललेली जीवनपद्धती. सध्याच्या काळात कष्ट न करता सर्वांना धन हवे आहे. त्यातून मुक्त आणि ऐषोआरामात जगण्याची सवय नव्या पिढीला लागत आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी एकत्रकुटुंब पद्धती गरजेची आहे. त्यातून संस्कृतीचे जतन होत होते. एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा वाढत जातो.’’ या कार्यक्रमाचे संयोजन भाऊ गोणते, मारुती गोणते, नवनाथ गोणते यांनी संयोजन केले होते.

भजनाच्या कार्यक्रमाने रंगत
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक बाळासाहेब वाईकर यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये गायिका अश्विनी मिठे, गायक नंदकुमार शेटे यांचे गायन झाले. त्यांना महादेव सगळे, शिवम शिंदे यांनीही साथ दिली. लक्ष्मण शेलार यांनी सूत्रसंचालन केले. यामध्ये वाईकर यांनी गायलेल्या अभंग, गौळणी तसेच हिंदी रचनांनी वातावरण भक्तिमय झाले होते.

१४६०१