
एचआयव्ही बाधितांनी केले नवीन वर्षाचे स्वागत
पिंपरी, ता. २९ : महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड व यश फाउंडेशन, चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने ख्रिसमस व नवीन वर्ष २०२३चे स्वागत यश फाउंडेशन कार्यालय, चाकण या ठिकाणी करण्यात आले. कार्यक्रमास महिंद्रा आणि महिंद्रा लि. चाकणचे अधिकारी सनी लोपेझ व यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते.
सनी लोपेझ म्हणाले, आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगा. येत्या नवीन वर्षात स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकल्प करा.
समाजातील प्रत्येक व्यक्तीप्रमाणेच या मुलांच्याही आयुष्यात काही आनंदाचे क्षण यावेत आणि अशा परिस्थितीत नववर्ष स्वागताच्या निमित्ताने त्यांच्या चेहऱ्यावर ती एक हास्य फुलावे आणि त्यांचा प्रत्येक क्षण हा आनंदात जावा. हा उद्देश साध्य करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास चाकण, खेड व मंचर मधील एचआयव्ही सहजीवन जगणारी ११० बालक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नवीन वर्षाच्या निमित्ताने मुलांच्या हस्ते केक कापून कार्यक्रम साजरा करण्यात आला. बालगोपाळांना भेटवस्तू, पोषण आहाराचे, चॉकलेट, बिस्किटांचे वाटप करण्यात आले.