
ग्रंथपाल वि. अ. जोशी यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली
पिंपरी, ता. २९ ः प्रयोगशील ग्रंथपाल, ग्रंथदाते, उद्योजक, विक्रयकला आणि स्वावलंबनाचे पुरस्कर्ते वि. अ. जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात आदरांजली सभा झाली.
शारदा ग्रंथपीठमचे संस्थापक संचालक पं. वसंतराव गाडगीळ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, जोशी यांचे पुत्र प्रकाश जोशी, अर्चना जोशी, ज्ञानेश्वर सावंत व ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोजराव देवळेकर उपस्थित होते. स्वरेषा पोरे यांनी सरस्वती वंदना सादर केली. नागेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. अध्यापिका सुहासिनी पानसे, ग्रंथपाल प्रतिभा महाजन, उदय विप्रदास व अर्चना येवले यांचा सत्कार केला. गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांशी संस्कृत भाषेत संवाद साधत वंदे मातरमचे महत्त्व व अर्थ विशद केला. वि. अ. जोशी म्हणजे जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व्यक्तिमत्त्व होते, असे गौरवोद्गार डॉ. जोशी यांनी काढले. सूत्रसंचालन सीमा महाजन यांनी केले. स्मिता माने यांनी आभार मानले.
---