‘आद्यक्रांतिगुरू... साळवे’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आद्यक्रांतिगुरू... साळवे’ 
चरित्रग्रंथाचे प्रकाशन
‘आद्यक्रांतिगुरू... साळवे’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन

‘आद्यक्रांतिगुरू... साळवे’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन

sakal_logo
By

‘क्रांतिकारकांचा इतिहास
साळवे यांच्याशिवाय अपूर्ण’

पिंपरी, ता. २९ ः ‘‘भारतीय क्रांतिकार्याचा इतिहास लहुजी वस्ताद साळवे यांच्या नामोल्लेखाशिवाय अपूर्ण आहे,’’ असे गौरवोद्‍गार पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे यांनी काढले. शाहीर आसराम कसबे लिखित ‘आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे’ चरित्रग्रंथाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘महाराष्ट्राचे शिल्पकार : चरित्र ग्रंथमालिका’ या उपक्रमांतर्गत ग्रंथाची निर्मिती केली आहे. त्याला मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे निवेदन असून, समाजसेवक गिरीश प्रभुणे यांची प्रस्तावना आहे. प्रकाशनप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, माजी अध्यक्ष राजेश पुणेकर, अतिश लांडगे, बी. के. कांबळे, शशिकांत खरात, जयश्री कुटे, अतुल आडसरे आदी उपस्थित होते. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमिला गाडे यांनी आभार मानले.