डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयास अ++ दर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयास अ++ दर्जा
डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयास अ++ दर्जा

डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयास अ++ दर्जा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ ः येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेतर्फे (नॅक) ‘अ + +’ ही सर्वोत्कृष्ट श्रेणी मिळाली आहे. अभ्यासक्रमांची श्रेणी, अध्ययन-अध्यापन, शैक्षणिक सुविधा, संशोधन आणि विस्तार, विद्यार्थ्यांची प्रगती, व्यवस्थापन, विविध उपक्रम आदीचा समावेश मूल्यमापनामध्ये केला होता, अशी माहिती प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘संशोधन वृद्धीसाठी राबविलेली धोरणे व संशोधनातील नावीन्यपूर्ण उपक्रम, इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट यांच्या सहयोगाने झालेले संशोधन प्रकाशने व पेटंट मानांकनामध्ये महत्त्वाचे ठरले आहे. विद्यार्थ्यांचे संशोधनातील कौशल्य वाढण्यासाठी फार्मा - इंडस्ट्रीज बरोबर चर्चासत्र, विविध औषधी कंपन्यांना भेटी आयोजित केले जाते.’’

नॅक मूल्यांकनामध्ये उत्कृष्ट मानांकन प्राप्त होणे, ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद कामगिरी आहे. संस्थेतील सर्वच कर्मचारी, विद्यार्थी यांनी सातत्याने चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे ही श्रेणी मिळाली आहे, अशा शब्दात डॉ. डी. वाय. पाटील यूनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील, उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.