दुचाकी चोरटा भोसरीत अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी चोरटा 
भोसरीत अटकेत
दुचाकी चोरटा भोसरीत अटकेत

दुचाकी चोरटा भोसरीत अटकेत

sakal_logo
By

पिंपरी : विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले. आरोपीकडून चोरीच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. रामेश्वर नवनाथ अडकीने असे आरोपीचे नाव आहे. रामेश्वर हा चोरीचे वाहन विकण्यासाठी भोसरीतील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, चिखली, म्हाळुंगे, चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याला भोसरी पोलिस ठाण्याच्या दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून अधिक तपास केला असता आयुक्तालयाच्या हद्दीत व भोसरी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरल्याचे समोर आले. रामेश्वर हा सराईत चोरटा असून, त्याने त्याचा साथीदार परशुराम कांबळे (रा. भोसरी) याच्यासोबत मिळून दुचाकी चोरीचे आठ गुन्हे केले. त्याच्याकडून भोसरी ठाण्याच्या हद्दीतील चार तसेच चिखली, दिघी, चाकण व भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या तेरा दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.