नवीन वर्षाचा जल्लोष करा, पण जपूनच; पोलिसांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police bandobast
जल्लोष करा, पण जपूनच पोलिसांचे आवाहन, नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त

New Year : नवीन वर्षाचा जल्लोष करा, पण जपूनच; पोलिसांचे आवाहन

पिंपरी - ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहर पोलिस दलातील सुमारे दीड हजार कर्मचारी, अधिकारी तैनात राहणार आहेत. याबरोबरच चाळीस ठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जाणार आहे. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर देखील कडक कारवाई होणार आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी, गैरप्रकार न करता नववर्षाचे उत्साहात स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांकडून विविध मॉल्स, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणची तपासणी करण्यात आली आहे. यासह रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही झाडाझडती घेतली आहे. शहरात चाळीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.

-पोलिस ठाणे, वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी

- मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची नजर

- सोनसाखळी चोर, पाकिटमार यांच्यावरही राहणार ‘वॉच’

- शहरातील गस्त वाढवली

- हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस मालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना

- कडेकोट बंदोबस्त

अधिकारी प्रतिक्रिया

शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी असेल. नागरिकांनी शांततेत नवीन वर्षाचे स्वागत करावे. कायद्याचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

- प्रशांत अमृतकर, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

असा असेल बंदोबस्त

 • अपर आयुक्त -१

 • उपायुक्त- २

 • सहायक आयुक्त - ५

 • निरीक्षक -४४

 • सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक- १३१

 • कर्मचारी - १२२३

 • एसआरपीएफ कंपनी-१

 • क्यूआरटी पथक -१

 • स्ट्रायकिंग पथक -१

 • होमगार्ड-१६९

आक्षेपार्ह माहिती मिळाल्यास येथे साधा संपर्क

नियंत्रण कक्ष

 • ९५२९६९१९६६

 • ९३०७९४५१८२

 • ११२