Thur, Feb 2, 2023

तळवडे येथे मॅनेजरला
विनयभंगप्रकरणी अटक
तळवडे येथे मॅनेजरला विनयभंगप्रकरणी अटक
Published on : 31 December 2022, 4:27 am
पिंपरी, ता. ३१ : महिलेशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीचा मॅनेजर व अकाउंट मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार तळवडे येथे घडला. या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मॅनेजर उत्तम बाबूराव पवार (वय ४८, रा. सहयोगनगर, तळवडे ), अकाउंट मॅनेजर जयंत जयदेव बर्मन (वय ३०, रा. तळवडे ) यांना अटक केली. फिर्यादी या एकट्या असल्याचे पाहून पवार याने त्यांचा हात जबरदस्तीने पकडून गैरवर्तन केले. हा प्रकार फिर्यादी यांनी बर्मन याला सांगितला असता, त्यानेही फिर्यादीशी अश्लील भाषेत बोलत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार तळवडे रोडवरील यश इंटरप्रायजेस व एम. आय. ट्रेडिंग कंपनीत घडला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------