गहुंजे स्टेडियम रस्ता अंधारात किवळे परिसर ः रस्त्यातील खड्डे आणि वीज नसल्याने रात्री अपघाताची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गहुंजे स्टेडियम रस्ता अंधारात
किवळे परिसर ः रस्त्यातील खड्डे आणि वीज नसल्याने रात्री अपघाताची शक्यता
गहुंजे स्टेडियम रस्ता अंधारात किवळे परिसर ः रस्त्यातील खड्डे आणि वीज नसल्याने रात्री अपघाताची शक्यता

गहुंजे स्टेडियम रस्ता अंधारात किवळे परिसर ः रस्त्यातील खड्डे आणि वीज नसल्याने रात्री अपघाताची शक्यता

sakal_logo
By

आकुर्डी, ता. २ : सध्या पावसाळा असल्याने कित्येक ठिकाणची वीज गायब होत आहे. त्यामुळे, रस्त्यावरून जाताना अनेकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. किवळे परिसरात सर्व्हिसरोडवर सायबर टाउन तसेच लिटिल अर्थ बिल्डिंगच्या जवळ असणाऱ्या व लोढामार्गे जाणाऱ्या रस्त्यावर अद्यापही विजेचे खांब बसवलेले नाहीत. रावेत, मुकाई चौक या भागातून येणाऱ्या अनेक गाड्या गहुंजे स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या रस्त्याकडे वळतात. भल्यामोठ्या डांबरी रस्त्यावर विजेविना अपघात होण्याची शक्यता आहे.
किवळे परिसरामध्ये विविध प्रकारच्या मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत. परंतु, इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जाण्यासाठी सर्विस रस्ता आहे. पण, त्या ठिकाणी खड्डे आणि विजेचे खांब नसल्याने त्या रस्त्यावरून जाताना लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. तसेच, त्या रस्त्यावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या अनेक महिलादेखील काही ठिकाणी उभ्या असतात. इमारतीमध्ये राहणाऱ्या मुलींना रात्रीच्या सुमारास त्या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---
- अर्चना तांबे, ( रहिवासी)
सध्या पावसाचे दिवस असल्याने त्या रस्त्यावर असलेले खड्डे दिवसा दिसतात. पण, रात्री मात्र विजेचे खांब त्या ठिकाणी नसल्याने गाडी चालविताना खड्डा आणि रस्ता काहीच दिसून येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
--
शिखा सिंग (रहिवासी)
महाविद्यालयात जाणाऱ्या अनेक मुली या रस्त्यावरून येत असतात. रात्रीच्या अंधारामध्ये कोणीही आजूबाजूला नसते. त्यात, विजेचे खांब नसल्याने गाडी नीट चालवता देखील येत नाही. त्यामुळे विजेचे खांब लवकरात लवकर बसवावे.

शुभांगी कुंभार (रहिवासी)
पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट सिटीकडे वळत आहे, पण त्यात आमच्या परिसरामध्ये सध्या अशी परिस्थिती निर्माण झाल्याने खरंच कधी-कधी प्रश्न पडतो की, आपण अजूनही स्मार्ट सिटी अंतर्गत येतो का?
फोटो ः 75047

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j23922 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..