तळेगावच्या आठवडे बाजारात सुविधांचा अभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावच्या आठवडे बाजारात सुविधांचा अभाव
तळेगावच्या आठवडे बाजारात सुविधांचा अभाव

तळेगावच्या आठवडे बाजारात सुविधांचा अभाव

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ४ : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे आठवडे बाजार दर रविवारी भरतो. या ठिकाणी जिल्ह्यातील भाजी विक्रेते मोठ्या संख्येने येतात. मात्र, त्यांना बाजारात भाजी विक्री करण्यासाठी जागा अपुरी पडते. तसेच नागरिक व महिलांसाठी स्वच्छतागृह दुरावस्था असल्यामुळे सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतागृह नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. बाजाराच्या नजीकच जिजामाता चौकात एकमेव स्वच्छतागृह आहे. त्याची दुरवस्था झाली आहे. २५ ते ३० वर्षांपूर्वीचे हे स्वच्छतागृह रस्त्यापासून दीड ते दोन फूट खाली आहे. रस्ता वरती आणि स्वच्छतागृह खड्यात खाली असल्यामुळे त्याची अवस्था बिकट झाली आहे. आत पावसाळ्यात पाणी शिरल्याने त्याचा वापर करता येत नाही. गटाराचे पाणी तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. हे स्वच्छतागृह पुरुष व महिलांसाठी असल्याने महिलांसाठी व पुरुषांसाठी तेथे फलक नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने येथे नवीन आद्यवत स्वच्छतागृह बांधून द्यावे, अशी नागरिकाची मागणी आहे.

...तर वाहतूक कोंडी थांबेल
या बाजारासाठी भाजी विक्रेते मावळ, जुन्नर, मंचर, खेड, चाकण व परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी व्यापारी भाजी विकण्यासाठी येत असतात. खरेदी करण्यासाठी तळेगाव व मावळातील नागरिक येतात. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी उसळते. काही विक्रेते जागा न मिळाल्याने भाजी विकण्यासाठी रस्त्यावर बसतात. त्यामळे त्यांच्या जागेची सोय केल्यास होणारी वाहतूक कोंडी थांबणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j23994 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top