
श्रमजीवी विद्यालयाचा शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान
पिंपरी, ता. २ ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास पिंपरी-चिंचवड (तालुका शहर) संघटनेतर्फे भोसरी येथील श्री अष्टविनायक एज्युकेशन सोसायटी संचलित श्रमजीवी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयास शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविले. डॉ. नारायण वाघोले, संजय ब्राह्मणकर, मधुकर ठाकरे, संजय मोरे आदी उपस्थित होते. श्रमजीवी शाळा ही पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील सामान्य लोकांची असामान्य शाळा असल्याचे मत वाघोले यांनी व्यक्त केले. ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ असे मानून गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, गरजू समाजातील पालकांच्या मुलांना अतिशय अल्पदरात दर्जेदार शिक्षणाबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी ही शाळा. विद्यार्थी कल्याणकारी योजना राबवत आहे. दहावीचा दरवर्षी शंभर टक्के निकाल प्राप्त करणारी व सर्व पालकांच्या पसंतीस उतरणारी शाळा रौप्यमहोत्सव साजरा करीत असल्याचेही ते म्हणाले. हेमंत दौंडकर, नंदकुमार ठाकूर, कारभारी पुंडे, विश्वनाथ कोरडे, चंद्रकांत कोरडे, मुख्याध्यापक सुनील भसे, बाजीराव राक्षे, बालवाडी विभागप्रमुख सुवर्णा बेलीडकर आदी उपस्थित होते.
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j23995 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..