
पावसाच्या हजेरीमुळे शहरात गारवा वाढला
पिंपरी, ता. २ : शहर परिसरात पावसाची ओढ कायम आहे. परंतु, आजूबाजूच्या शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गेल्या चार दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवत आहे. तापमान २८ अंश असूनही पावसाच्या हलक्या सरी शहरात बरसत असल्याने दिवसभर वातावरण ढगाळ राहत आहे. परिणामी, नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. तसेच, पावसाळी कपडे खरेदी करण्यास पिंपरी बाजारपेठेत काही अंशी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या शहरात वाऱ्याचा वेग प्रती तास ११ किलोमीटर झालेला आहे. त्यामुळे देखील वातावरणात गारवा पसरला आहे. काही जण या गारव्यामुळे मध्येच उबदार कपडे घालताना दिसत आहेत. तर, काही जण पावसाळी कपडे देखील सोबत बाळगत आहेत. पाऊस काही प्रमाणात लांबल्याने अद्यापपर्यंत धो-धो पावसाची हजेरी शहरात लागलेली नाही. त्यामुळे, वातावरणात गारवा वाढला आहे. त्यामुळे, काही जणांना वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला व ताप, अपचनाचा त्रास, हात-पाय दुखण्यासह व्हायरल संसर्गाला सामोरे जावे लागत आहे. काही अंशी रुग्णालयातही ताप- सर्दीचे रुग्ण वाढलेले दिसून येत आहेत.
शहरात काही काळ मध्येच कडक ऊनही पडत आहे. त्यामुळे, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना या वातावरणाचा लहान मुले, ज्येष्ठ मंडळी व महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे, अति थंड पदार्थांचे सेवन टाळून दिवसभर कोमट पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24001 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..