इंदिरा नॅशनल स्कूलमध्ये म्युझिक अकादमी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदिरा नॅशनल स्कूलमध्ये
म्युझिक अकादमी सुरू
इंदिरा नॅशनल स्कूलमध्ये म्युझिक अकादमी सुरू

इंदिरा नॅशनल स्कूलमध्ये म्युझिक अकादमी सुरू

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : वाकड येथील इंदिरा नॅशनल स्कूलमध्ये (आयएनएस) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘साउंड ऑफ म्युझिक अकादमी’ सुरू केली. उद्घाटनप्रसंगी इंदिरा शिक्षण समूहाच्या (आयजीआय) अध्यक्षा डॉ. तरिता शंकर अध्यक्षस्थानी होत्या. समूह संचालक प्रा. चेतन वाकळकर यांच्यासह सर्व विश्वस्त, संचालक, प्राचार्य, हेड ऑफ डिपार्टमेंट आणि प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थी भारतीय व्होकलसोबत पाच वेगवेगळी वाद्ये रोटेशनल आधारावर तज्ज्ञ शिक्षकांकडून शिकणार आहेत, जेणेकरून, रोटेशनल कालावधीनंतर विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार वाद्य निवडू शकतील. गिटार, कीबोर्ड, ड्रम, बासरी आणि तबला ही पाच वेगवेगळी वाद्ये आहेत. आमचे विद्यार्थी अकादमीतील त्यांच्या संगीतमय प्रवासाचा आनंद घेतील, अशी खात्री असल्याचा विश्वास डॉ. शंकर यांनी व्यक्त केला.

फोटो - 75139

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24049 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..