उच्च न्यायालयाचा फेरीवाल्यांना दिलास निर्णयाचे स्वागतः बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उच्च न्यायालयाचा फेरीवाल्यांना दिलास
निर्णयाचे स्वागतः  बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश
उच्च न्यायालयाचा फेरीवाल्यांना दिलास निर्णयाचे स्वागतः बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश

उच्च न्यायालयाचा फेरीवाल्यांना दिलास निर्णयाचे स्वागतः बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून होत असलेल्या कारवाईच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात २२ जून २०२२ रोजी युक्तिवाद होऊन उच्च न्यायालयाने सर्वेक्षण असलेल्या फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे व निरंतर स्थगिती आदेशाचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे फेरीवाल्यांनी एकमेकाला मिठाई भरवून नुकताच आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून १३ ऑक्टोबर २०२१ रोजी माननीय उच्च न्यायालयाने प्रमाणपत्र धारकांवर कारवाईस स्थगिती दिलेली आहे. त्यांनतर त्यावर सुनावणी होऊन निकाल आला. त्याचा आनंद व्यक्त करताना कामगारनेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, प्रदेश संघटक अनिल बारवकर, बालाजी लोखंडे , इस्माईल चौधरी, सुरेश देडे, शौकत शहा, राजाभाऊ खंडागळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने वारंवार मागणी करूनही ज्यांचे सर्वेक्षण झालेले आहे. ज्यांच्याकडे पावती आहे, ते ही पात्र लाभार्थी आहेत, यांच्यावर कारवाई करू नये, अशी अनेक वेळा मागणी केली. मात्र महापालिका प्रशासनाने या सर्व लोकांना अपात्र व बाद ठरवले आणि त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना सर्वेक्षण न करता चुकीचे एजन्सीला काम देऊन त्यांना वंचित ठेवण्यात आले. या विषयाला घेऊन उच्च न्यायालयमध्ये युक्तिवाद झाला व ज्यांचे बायोमेट्रिकक अपूर्ण आहे, अशा ३१०२ विक्रेत्यांना कायद्यानुसार लाभ होणार आहे. ज्यांना बाद केले, अपात्र केले अशा विक्रेत्याला न्यायलयामुळे संधी प्राप्त झाल्याचे समाधान फेरीवाल्यांनी व्यक्त केले.

महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हॉकर झोनची प्रक्रिया रखडली आहे. मनमानी पद्धतीने जागा निवडण्यात येत आहेत. यामध्ये फेरीवाल्याला विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणच्या जागा मंडई ओस पडलेल्या आहेत. या पुढील काळात व्यवसाय पूरक जागा निवडण्याची आमची मागणी आहे.
- काशिनाथ नखाते, कामगारनेते.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रांमध्ये १० हजार १८३ लोकांचे सर्वेक्षण झाले. त्यामध्ये ९०२५ लोक पात्र झाले आणि ५९२३ लोकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले. उर्वरित ३१०२ लोकांना पुढील सर्व हक्क देण्यासाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ प्रयत्नशील आहे.
- अनिल बारवकर, कामगारनेते.
फोटो ः 75158

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24052 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..