पैसे व सोन्यासाठी ‘त्या‘ महिलेचा खून केल्याचे उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे व सोन्यासाठी ‘त्या‘ महिलेचा खून केल्याचे उघड
पैसे व सोन्यासाठी ‘त्या‘ महिलेचा खून केल्याचे उघड

पैसे व सोन्यासाठी ‘त्या‘ महिलेचा खून केल्याचे उघड

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : चिखलीतील हरगुडे वस्ती येथे एक वर्षापूर्वी झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले. पैसे व सोन्याच्या दागिन्यांसाठी सात जणांच्या टोळक्याने कट रचून महिलेला संपविल्याचे समोर आले आहे.
कमल बाबूराव खाणेकर ऊर्फ नूरजहाँ अजीज कुरेशी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मोहंमद मोनीष ईसरार अहमद शेख (वय २५, रा. वीरबाबा चौक, साईनगर, देहूरोड), वासीब उर्फ टोनु मोनू रईस खान (वय २२, रा. झेंडेमळा, देहूगाव), अब्दुल मुनाफ अब्दुल मलिक अन्सारी (वय २४, रा. रुपीनगर, तळवडे), रईसउद्दीन सुलतान अहमद राईन (रा.वय ४०, मोरेवस्ती, चिखली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अल्लाउद्दीन राहिस (रा. ओटास्कीम, निगडी), मोहंमद अकील राइन, जरीश राईन (दोघेही रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ५ ऑगस्ट २०२१ रोजी कमल यांचा घरात शिरून त्यांचे हातपाय बांधून, तोंडाला चिकटटेप लावून, गळा आवळून खून केल्याचा प्रकार घडला. सखोल तपास करूनही पोलिसांच्या हाती काहीही धागेदोरे हाती लागत नव्हते. दरम्यान, आर्म ऍक्टच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या मोहंमद शेख याचे वर्तन संशयास्पद वाटले. त्यावरून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने व त्याचे साथीदार वासीब, अब्दुल यांनी कमल यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
ही महिला येथे एकटीच राहत असून तिच्या अंगावर भरपूर दागिने असत. तसेच ती जमीन खरेदी विक्री करीत असल्याने तिच्याकडे मोठ्याप्रमाणात पैसे असल्याची शक्यता असल्याचे अल्लाउद्दीन रईस याने त्यांना सांगितले. तसेच तिचा गेम केल्यास पूर्ण आयुष्य सेट होईल, असेही तो म्हणाला. त्यानुसार आरोपींनी कट रचून खून केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24325 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top