भात रोपे तयार; पावसाची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात रोपे तयार; पावसाची प्रतिक्षा
भात रोपे तयार; पावसाची प्रतिक्षा

भात रोपे तयार; पावसाची प्रतिक्षा

sakal_logo
By

आकुर्डी, ता. ४ ः खरीप हंगामात भात पीक घेण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. काही ठिकाणी भात रोपवाटिकांमध्ये बियाणे दोन आठवड्यांपूर्वी टाकून भाताची रोपेदेखील उगवली आहे. पण अद्यापही पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
साधारणतः जूनच्या पहिल्याच आठवड्यात भात रोपवाटिकांमध्ये बियाणे टाकून रोप तयार केली जातात. आणि जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भात लागवडीला सुरवात देखील होते. परंतु, यंदा पाऊस वेळेवर पडला नसल्याने अजूनही भात लागवड सुरू करण्यात आली नाही. जमीन मशागती, खाचरे तयार करणे, रोटर मारणे, जमीन भिजवणे आदी कामांना सुरवात झाली आहे. भात पट्ट्यात प्रामुख्याने दरवर्षी पाऊस झाल्यानंतर म्हणजेच जून, जुलैमध्ये
भात लागवड केली जाते. एक एकर भात लागवडीसाठी शेतकरी अर्ध्या गुंठ्यापासून ते पाच गुंठ्यांपर्यंत रोपवाटिका तयार करतात. साधारणपणे एक ते सव्वा महिन्याची रोपे झाल्यानंतर त्यांची टोकण पद्धतीने लागवड केली जाते. सध्या जमिनीची नांगरट करणे, शेणखत टाकणे आदी कामे करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
पावसाने सध्या जोर न पकडल्याने शहरामध्ये शेती करणाऱ्या कित्येक शेतकऱ्यांची भात लागवड लांबणीवर पडली आहे. काही ठिकाणी भात बियाणे दुबार पेरणीचं संकटही येऊन ठेपले आहे. दमदार पाऊस पडल्याशिवाय भाताच्या बियाण्याचे तरवे जोमदार येत नाहीत. यावर्षी पर्जन्यमान योग्य प्रमाणात नसल्याने भात लागवड ही लांबणीवर पडली आहे. जोरदार पावसाची आस सर्व शेतकऱ्यांना लागली आहे.

आम्ही दरवर्षी शेती करतो. यंदा देखील भाताची रोप पेरून तयार आहेत. ती लागवडीला आली आहेत. पण अद्यापही जोमाने पाऊस पडत नसल्याने भात लागवड केलेली नाही.
- खंडू भोंडवे, शेतकरी

दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये भात लागवड झालेली असते. यंदा मात्र जून कोरडा गेलेला आहे. पाऊस न झाल्याने भात लागवडीला उशीर होतो आहे.
- संभाजी भोंडवे, शेतकरी

शेती व शेतातील पिके वाचविण्यासाठी पाऊस वेळेवर येणे गरजेचे आहे. पिकांबरोबरच पिण्यासाठीही पाण्याची गरज आहे. पाऊस न आल्यास पिकांचे नुकसान देखील होऊ शकते.
- पोपट तरस, शेतकरी
---
फोटो ः 75385

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24415 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top