भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक नियुक्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक नियुक्तीची मागणी
भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक नियुक्तीची मागणी

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक नियुक्तीची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक तातडीने नियुक्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली बोराटे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सीमा पांचाळ यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांची बदली झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या जागी कोणाचीही नेमणूक केलेली नाही. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, या ठिकाणी त्वरित नेमणूक करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षातर्फे बोराटे व पांचाळ यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24902 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..