शिक्षण संस्थाकडून आरटीइच्या नियमांना केराची टोपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण संस्थाकडून आरटीइच्या
नियमांना केराची टोपली
शिक्षण संस्थाकडून आरटीइच्या नियमांना केराची टोपली

शिक्षण संस्थाकडून आरटीइच्या नियमांना केराची टोपली

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : प्राथमिक शिक्षण मिळविणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्याअनुषंगाने शासनस्तरावरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी विविध निर्णय व धोरणे पारित होत असतात. शिक्षणाच्या उदात्त हेतूसाठी प्राथमिक शाळेतील मुलांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत मुलांना प्रवेश मिळण्याची तरतूद आहे. परंतु, काही शाळा स्वत:च्या आर्थिक लाभापोटी नियमांना केराची टोपली दाखवीत आहेत. परिणामी, पालकांच्या तक्रारी प्राप्त होत असून या शाळांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे शहराध्यक्ष उदयकुमार पाटील यांनी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला जात आहे. स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी काही शिक्षण संस्था अग्रेसर आहेत. हे पालकांचे शोषण थांबवावे. कोरोना महामारीमुळे अद्यापही आर्थिक कोंडी सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत शिक्षणाची पूर्तता होणे अत्यावश्यक आहे. काही पाल्यांनी आर्थिक कुवतीनुसार कमी खर्चाच्या शाळेत मुलांना प्रवेश घेतला आहे. याचा गैरफायदा घेत काही शाळांनी मुलाचे एल.सी व टी.सी प्रमाणपत्र अडवून ठेवले आहे. यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य होणार नाहीत, याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी. असह्य पालकांना न्याय मिळावा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24991 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top