सैनिकांसाठी विविध उपक्रमांना मान्यता स्थायी समितीच्या एकूण ४१ कोटींच्या खर्चास आयुक्तांची मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैनिकांसाठी विविध उपक्रमांना मान्यता
स्थायी समितीच्या एकूण ४१ कोटींच्या खर्चास आयुक्तांची मंजुरी
सैनिकांसाठी विविध उपक्रमांना मान्यता स्थायी समितीच्या एकूण ४१ कोटींच्या खर्चास आयुक्तांची मंजुरी

सैनिकांसाठी विविध उपक्रमांना मान्यता स्थायी समितीच्या एकूण ४१ कोटींच्या खर्चास आयुक्तांची मंजुरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना तसेच, त्यासाठी येणाऱ्या सुमारे ४१ कोटी ९० लाख इतक्या खर्चास मंगळवारी प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि माजी सैनिक संघ यांच्यावतीने शहीद कर्नल संतोष महाडीक भवन या बहुउद्देशीय इमारतीमध्ये विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी मान्यता दिली. सेवानिवृत्त सैनिक, सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्कील डेव्हलपमेंट सेंटर, विद्यार्थ्यांसाठी सेना दलातील व इतर स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन केंद्र, सेवा निवृत्त सैनिकांसाठी मोबाईल आरोग्य केंद्र आणि विधवांसाठी लघुउद्योग मार्गदर्शन केंद्र, संरक्षाणाशी संबंधित सर्व पुस्तकांचे ग्रंथालय व वाचनालय, माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांसाठी वधू-वर सूचक केंद्र, सेवानिवृत्तीनंतर नोकरी विषयी माहिती व मार्गदर्शन केंद्र, माजी सैनिकांच्या परिवारासाठी समुपदेशन केंद्र, त्यांच्या पेन्शन विषयी समस्या व त्यावरील उपाय, समुपदेशन केंद्र, माजी सैनिकांना राज्य कल्याण विभागाकडून उपलब्ध सवलती देण्याचे कार्य करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महापालिका क्षेत्रातील १८ ते ३५ वयोगटातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, विविध कौशल्य असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांना नामांकित संस्थांमार्फत मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मालमत्ता कर ऑनलाईन भरणाऱ्या मालमत्ताधारकास सामान्य करात सवलत दिली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२२ अखेर सामान्य कर ऑनलाइन भरल्यास ४ टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच, ताथवडे येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याच्या कामास मान्यता दिली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच, नदीचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय कनिष्ठ हॉकी स्पर्धा २०२२ च्या आयोजनासाठी महापालिका सभेची मंजुरी आवश्यक होती, या विषयास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.

- या खर्चाला मिळाली मंजुरी
प्रभाग क्रमांक ११ मधील शरदनगर नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी, प्रभाग क्रमांक १ मधील चिखली येथील पाटील नगर, बर्गे वस्ती, धर्मराज नगर, शेलार वस्ती परिसरात जलनि:स्सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी सुमारे ४५ लाख ८८ हजार रुपये खर्चास, प्रभाग क्रमांक १५ मध्ये सेक्टर क्रमांक २३, २४,२५,२६,२७,२८, नवनगर विकास प्राधिकरण वाहतूकनगरी, परिसरातील जलनि:स्सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा तसेच जलनि:स्सारण नलिका टाकण्यासाठी ३० लाख २५ हजार रुपये खर्चास, देहू आळंदी या ३० मीटर डी.पी. रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ९८ लाख ४० हजार रुपये खर्चास, महापालिकेच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रास आवश्यक साहित्य खरेदीसाठी ३० लाख रुपये इतक्या खर्चास, प्रभाग क्रमांक २१ मधील आरक्षण क्रमांक १६६ येथे उद्यान विकसित करण्यासाठी १ कोटी ६२ लाख इतक्या खर्चास, चऱ्होली येथील अमॅनिटी स्पेस येथे इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बसगाड्यांच्या चार्जिंगसाठी ईव्ही स्टेशन उभारणी व उच्चदाब वीजपुरवठ्याशी संबंधित कामे करण्यासाठी १ कोटी ५२ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच, शहराच्या हद्दीतील पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी सुमारे ८ लाख ५० हजार इतक्या खर्चास, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत सुधारणांची पूर्तता केल्याबद्दल प्राप्त झालेले प्रोत्साहन अनुदान सुमारे ३ कोटी ३२ लाख रुपये, पीएमपीएमएलला जुलै २०२२ च्या संचलन तुटीपोटी अग्रिम स्वरूपात १६ कोटी रुपये अदा करण्यासाठी प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25275 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top