एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण
एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण

एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : ‘माझी एमआयडीसी, स्वच्छ एमआयडीसी, हरित एमआयडीसी’ या संकल्पनेनुसार फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते बुधवारी (ता. ६) करण्यात आले.
भोसरी एमआयडीसी परिसरात ‘टी ब्लॉक’ येथे आयुक्त राजेश पाटील, उद्यान विभाग उपायुक्त इंगळे, उद्योजकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण समारंभ झाला. हा उपक्रम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर व पिंपरी चिंचवड महापालिका उद्यान विभाग यांनी पुढाकार घेऊन आयोजित केला होता. एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्यांनी आपल्या बाहेरील बाजूस सुशोभीकरण करण्यास सुरवातदेखील केली असून, पर्यावरण संस्कार उद्यानाच्या बाहेरील बाजूस आयुक्त पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. फोरम ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनचे सदस्य नुटेक कपलिंग या कंपनी बाहेरील केलेल्या सुशोभीकरणाचे आयुक्त पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आयुक्त पाटील म्हणाले की, महापालिकेतर्फे उद्योजकांसाठी अनेक मूलभूत सुविधा चालू केल्या असून, उद्योजकांना कोणत्याही अडचणी असल्यास त्याबाबत पाठपुरावा करून त्वरित सोडविण्यात येईल.
अभय भोर यांनी प्रत्येक उद्योजकास आवाहन केले की, कंपनी बाहेरील बाजूस वृक्षारोपण करण्यास पुढाकार घेतलाच पाहिजे. एमआयडीसी परिसरात २१ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘एमआयडीसी’मध्ये प्रत्येक कंपनीबाहेर सुशोभीकरण करण्यासाठी कंपन्यांचा सहभाग यामध्ये वाढत आहे.
याप्रसंगी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, न्यू टेक कंपनीचे डायरेक्टर बन्सी मंघानी, डेक्कन मेकॅनिकल कंपनीचे उपाध्यक्ष मिलिंद काळे, फोरमचे उपाध्यक्ष वैभव जगताप, श्री स्टॅम्पिंग कंपनीचे मॅनेजर विनायक बसरकर, दुर्गा ब्रिगेड अध्यक्ष दुर्गा भोर, क्वॉलिटी ऑटो कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर शिवाजी पाटील, मोंगा इंडस्ट्रीजचे जसबिंदर सिंग व उद्योजक उपस्थित होते.
फोटो ः 76226

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25600 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..