रुग्णसंख्या अत्यल्प असूनही ‘आरटीपीसीआर’ च्या अहवालाला विलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rtpcr test
‘आरटीपीसीआर’ च्या अहवालाला विलंब रुग्णसंख्या अत्यल्प असूनही तीन दिवसानंतर रिपोर्ट हाती

रुग्णसंख्या अत्यल्प असूनही ‘आरटीपीसीआर’ च्या अहवालाला विलंब

पिंपरी - यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) कोविड चाचणीचा आरटीपीसीआर अहवाल ४८ तासांत मिळणे आवश्यक असताना तब्बल तीन दिवस उलटूनही अहवाल वेळेत मिळाला नाही. एका रुग्णाने ५ जुलैला दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी केलेल्या चाचणीचा अहवाल ८ तारखेला वायसीएम प्रशासनासोबत संपर्क साधल्यानंतर दुपारी रुग्णाच्या हातात मिळाला. परिणामी, तोपर्यंत रुग्णाने गृहविलगीकरणात राहायचे की, चाचणीच्या अहवालाची वाट पाहायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, रुग्णसंख्या कमी असूनही अहवाल मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोविड काळात दिवसाला ३०० ते ४०० स्वॅब घेतले जात होते. सध्या दिवसाला ५० देखील स्वॅब नसतात. त्यामुळे, अहवाल रुग्णांना वेळेत मिळणे अपेक्षित आहे. ॲंटिजेन चाचणी अद्यापही नावापुरतीच आहे. त्यासाठी योग्य ते प्रमाणीकरण नाही. काही खासगी लॅब अद्यापही कोरोना रुग्णांकडून आरटीपीसीआर चाचणीसाठी जादा पैसे आकारत आहेत. काही ठिकाणी या चाचणीसाठी ५०० ते १ हजार रुपये आकारले जात आहेत. ‘आयसीएमआर’कडून रॅट चाचणीला घरातून करण्यासही परवानगी मिळालेली आहे. परंतु, नागरिकांना अद्याप त्याचा सराव नाही. नागरिक वायसीएम प्रशासन व नियुक्त शासकीय दवाखान्याच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचणीकडे वळत आहेत. त्यासही विलंब होत असल्याने नाइलाजास्तव नागरिकांना तोंड दाबून बुककयांचा मारा सहन करावा लागत आहे. मात्र, आरटीपीसीआर चाचणीमध्ये नाकातील व घशातील नमुने घेऊन चाचणी केली जात आहे. आरटीपीसीआर चाचणीच्या माध्यमातून योग्य निष्कर्ष काढला जात आहे. परंतु, याचा अहवाल आयसीएमआरकडून येण्यास विलंब होत आहे.

७ जुलैची कोविड रूग्ण संख्या

सकारात्मक रुग्ण संख्या : २२०

दाखल : ४४

मृत्यू : १

आपण आयसीएमआरकडून पोर्टलला माहिती अपलोड करतो आणि आयसीएमआरकडून त्यानंतर संदेश मिळणे आवश्यक आहे. आमच्याकडून त्याच तारखेला रिपोर्ट तयार होऊन पाठवला होता. ४८ तासात रिपोर्ट मिळायला हवा. ट्रान्सपोर्टमध्ये विलंब लागल्यास किंवा मोबाईल लिंक मिसिंगमुळे विलंब होवू शकतो.

- राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25886 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top