गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

गुन्हे वृत्त

दिघीत कुटुंबीयांना जिवे मारण्याची
धमकी देत महिलेवर अत्याचार

पिंपरी, ता. ९ : कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार मोशी येथे घडला. आकाश केरनाथ बदे (वय २३, रा. आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी व त्याचे इंस्टाग्रामचे चॅटिंग व सोबतचे फोटो फिर्यादीच्या पतीला दाखविण्याची धमकी देत फिर्यादीवर वेळोवेळी अत्याचार केला. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


गुटखा विक्रीप्रकरणी हिंजवडीत एकाला अटक

बेकायदारित्या गुटखा विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई हिंजवडी येथे करण्यात आली. मोहमदतौफिक इन्सानअली शाह (वय ३०, रा. साईनगर, कासारसाई, मूळ- उत्तरप्रदेश) याला अटक केली असून शाह याला गुटखा पुरविणाऱ्या आणखी एकावर गुन्हा दाखल आहे. शाह याने विक्रीकरिता गुटखा बाळगल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी चारच्या सुमारास हिंजवडीतील लक्ष्मी चौक येथील पान शॉपवर छापा टाकला. येथे साडे तीन हजार रुपये किमतीचा गुटखा विक्रीसाठी शाह याने जवळ बाळगल्याचे समोर आले. तो गुटखा कोणाकडून आणला याबाबत चौकशी केली असता एकजण मागणीप्रमाणे हा गुटखा आणून देत असल्याचे शाह याने सांगितले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

भोसरीत देवदर्शन घेत असताना मोबाईल लंपास

मंदिरात देवदर्शन घेत असताना एकाचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार भोसरी येथे घडला.
याप्रकरणी अन्जय्या शंकर कलाल (रा. जे ब्लॉक, एमआयडीसी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी शुक्रवारी (ता. ८) सकाळी सहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील एका मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन घेत असताना त्यांच्या हातातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावला. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांवर गुन्हा

पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोघांवर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई चिंचवड येथे करण्यात आली. दिनेश वासुमल करमचंदानी (वय २८, रा. विजयनगर, काळेवाडी) याला अटक केली असून रॉकी याच्यावर गुन्हा दाखल आहे. हे दोन आरोपी संगनमत करून स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी दोन पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत. त्यातून मिळालेल्या पैशांतून स्वतःची उपजीविका भागवायचे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता छापा टाकून पीडित महिलांची सुटका केली. तसेच साडे तीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चिंचवड रेल्वे स्थानकापासून दळवीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत करण्यात आली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चिखलीत पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला
रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावल्याची घटना चिखली येथे घडली. समीर फयाज शेख (रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद हे
खानावळीत जेवण करून टॉवर लाईन येथील रस्त्याने पायी घरी जात होते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या आरोपीने त्यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26333 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top