पालखी जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी जोड
पालखी जोड

पालखी जोड

sakal_logo
By

भारतीय जैन संघटना विद्यालय
पिंपरी, ता. ९ : शाळेत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयेाजन केले होते. यावेळी नगरसेविका सुजाता पालांडे, मुख्याध्यापक संजय जाधव, प्राचार्य दिलीप देशमुख, उपप्राचार्य राजेंद्र कोकणे, पालकसंघाचे उपाध्यक्ष अश्विनी रोकड, सहसचिव अमोल कांबळे उपस्थित होते. काटकसरीने पाणी वापरण्याबाबत सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. झाडे लावा झाडे जगवा, पाण्याचा वापर जपून करा, अशा विविध घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. विविध संतांच्या वेशभूषा मुलांनी परिधान केल्या होत्या. शैला बर्वे यांनी ‘हरी तू आमचा सवंगडी व मात भरली पंढरी, देव जेवला हो देव जेवला’ अशी भजने विद्यार्थ्यांनी सादर केली. विलास गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहलता वाडेकर यांनी आभार मानले. दीपिका सावंत, अरुण धिवार, प्रदीप बोरसे, भाग्यश्री भोईर, सुवर्णा जाधव, अपर्णा कुमठेकर, सायली माने, प्रणाली खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

विद्यादीप शिक्षण संस्था
आषाढी निमित्त मुलांनी लेझीम सादर करून फुगड्या घातल्या. तसेच, ज्ञानेश्वर-माउलीं पालखीची मिरवणूक काढली. टाळ, मृंदूगाच्या गजरात अभंग गायन झाले. तसेच, आरोग्याची गुरुकिल्लीचा महत्त्वाचा संदेश मुलांना दिला. उपक्रमात मुख्याध्यापक, शिक्षक व पालक सहभागी झाले होते.

पी. जोग इंग्लिश मीडियम स्कूल
शाळा प्रांगण ते राम मंदिरापर्यंत पालखी सोहळा साजरा केला. ग्रंथदिंडी पखवाज टाळ्यांच्या, राम कृष्ण हरीचा गजरात काढली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर, संत तुकाराम, जनाईच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. शाळेच्या प्रांगणात भजन गवळण तथा भक्तीगीत, फुगड्या सादर झाल्या. आर्यन गलांडे, रिया शिंदे, स्वरा शेलार, वैभव काटे, शुभम बागलेर, सानवी सोमवंशी, स्वरा चंदन या विद्यार्थिनींनी विठ्ठल-रुक्मिणी, तुकाराम महाराजांच्या भूमिकेत पालखीत सहभाग नोंदवला. पालक प्रतिनिधी पूजा गुरंग, विद्या हरण, पूजा खैरे, पल्लवी भांगे, राधा कुलकर्णी, सीमा भडगावकर या शिक्षकांनी भक्ती गीत सादर केले. संस्थाध्यक्षा सुरेखा जोग, विश्वस्त डॉ. अमोल जोग, शुभदा जो, ग्रुप डायरेक्टर डॉ. तुषार दगडे, तसेच विद्यालयातील प्रमुख योगेश बसुदे, विद्या गोरे, रजनी तांबे, कल्पना पित्रे, जयश्री साबळे, अश्विनी गुजरे, स्नेहल बनारसे, वैजयंती देवलकर, सोनल दास या शिक्षकांनी पालखीत विद्यार्थ्याचे मनोबल वाढवले. राधा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सीमा भडगावकर यांनी आभार केले.

एम. एम. विद्यामंदिर
काळेवाडी शाळेत त्यानंतर दिंडी काढून अभंग गायन स्पर्धा घेतली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. वाल्लेकर यांनी पालखीचे पूजन केले. विद्यार्थ्यांना संतांच्या कार्याविषयी माहिती दिली. विद्यालयात अभंग गायन स्पर्धेमध्ये आठवी व नववीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. धनवे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळेस सर्व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

श्री प्राथमिक जैन विद्यामंदिर
चिंचवडमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला. सर्व बालचमू वारकरी विविध संतांच्या वेशभूषेत आले. टाळ, लेझीम, तुळशी, कल पथकांचा दिंडीत सहभाग होता. बालचमूंनी रिंगण करत विविध कला सादर केल्या. यावेळी विठ्ठलभक्त शिंदे व लवटे आजी यांनी वारीची माहिती दिली. सेक्रेटरी राजेंद्रकुमार मुथा, शंकरलाल मुथा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिल्पा कुलकर्णी यांनी पंढरीचा महिमा प्रास्ताविकातून सांगितला. शिक्षकांनी संयोजन केले.

श्री गुरू गणेश विद्या मंदिर
निगडीतील प्रशालेत पालखी व रिंगण सोहळा उत्साहात झाला. संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी राजेंद्र कांकरिया, सहायक सचिव अनिल कांकरिया यांनी आषाढीच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केल्या. मुलांनी पताका, झेंडे व डोक्यावर तुळस घेतली. विठू माउलीची आरती केली. मुख्याध्यापक एच. एन. मारकड, पर्यवेक्षक एच. एस. लोखंडे यांनी पालखी पूजन केले. वाखारीचे रिंगण जणू विद्यालयात अवतरले. धन्य ही पंढरी हा अभंग सादर केला. येग येग रखुमाई, इथे नांदती श्रीहरी, या गीतावर नृत्य सादर केले. एम. एल. तोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक
प्रतिनिधी डी. एल. थोरात यांनी आभार मानले. आर. एच. पिताकीया, एस. एस. सुरवसे, डी. एस. कांबळे, एस. डी. जंगले यांनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26364 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top