केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये अवतरला संतमहंतांचा मेळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये 
अवतरला संतमहंतांचा मेळा
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये अवतरला संतमहंतांचा मेळा

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये अवतरला संतमहंतांचा मेळा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः आकुर्डी येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात झाला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव, संत सावता माळी, संत गोरोबा काका, संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यातून वारीची अनुभूती आली.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, सचिव ज्ञानेश्वर काळभोर, संचालक राम रैना, संचालिका शीतल वर्णेकर, उपप्राचार्य सरबजीत कौर यांनी विठ्ठल-रुक्मिणी, पादुका व पालखीची पूजा केली. शिक्षक परीक्षित कुंभार यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका रोहिणी सुतार यांनी कीर्तनातून संत मुक्ताईने संत ज्ञानेश्वर माउलींना केलेली आर्त विनवणी व परमेश्वर भक्तीचे सामर्थ्य असलेल्या ताटीच्या अभंगाचे निरूपण केले. विद्यार्थ्यांनी भजने व अभंग सादर केली. पंढरीच्या वारीचा महिमा व ऐतिहासिक परंपरेचे नृत्याअभिनयाद्वारे सादरीकरण केले. पसायदानाने समारोप झाला. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ व ‘जय जय राम कृष्ण हरी’चा जयघोष करीत वारीतील रिंगण सोहळ्याची अनुभूती आली. भारतीय गुरुकूल परंपरा व मूल्य आधुनिक शिक्षणाचीद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल समर्थपणे करीत असल्याचे गौरवोद्गार अध्यक्ष डॉ. वर्णेकर यांनी काढले. सुरेखा आवटे व श्रुती तातू यांनी सूत्रसंचालन केले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26418 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top