पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशन

पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

वारी विशेष पुरवणीचे
पंढरपूरमध्ये प्रकाशन

पंढरपूर, ता. १० : आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीसोबत रविवारी (ता. १०) दैनिक आकारातील आठ पानी ‘आषाढी वारी विशेष’ पुरवणी प्रसिद्ध केली. तिचे प्रकाशन पुण्यातील वृत्तपत्र विक्रेते बांधवांनी पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रातील पुंडलिक मंदिराजवळ केले.
पुण्यातील अप्पा बळवंत चौक परिसरातील वृत्तपत्र विक्रेते राम दहाड, दीपक खुटवड, नितीन रेवाळे, जितेंद्र यादव, भावांक पारखे, रमाकांत कांबळे, विजय गावडे, मिलिंद भाटवडे, शशिकांत खाटपे, विनोद देवकर, चैतन्य खोपडे, महेश शिंदे, पवार काका आदींनी पंढरपूर येथे जाऊन चंद्रभागा नदीत स्नान केले. पुरवणीचे प्रकाशन करून त्यातील विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राची पूजा करून आरती केली. या अंकाला चंदनाचा सुगंध आहे. पुरवणीत ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, कीर्तनकार जयवंत महाराज बोधले यांच्यासह कीर्तनकार, वारकरी, सेवेकरी यांचे लेख आहेत. विठ्ठल-रखुमाईसह वारीतील क्षणचित्रे दर्शविणारे छायाचित्रे आहेत. आषाढी वारी व पांडुरंगाचे दर्शन वाचकांना घरबसल्या व्हावे, हा पुरवणी मागील हेतू आहे.
कोट
------
चंद्रभागा नदी पात्रातील पुंडलिक मंदिराजवळ ‘सकाळ’च्या वारी विशेष पुरवणीचे प्रकाशन केले. एक अंक विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिमद्वारी व एक अंक पंढरपूर येथील ताकपेरे विठोबा मंदिरात पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला. या अंकाच्या निमित्ताने आम्हा वृत्तपत्र विक्रेते बांधवांची वारीही रूजू करता आली.
- राम दहाड, वृत्तपत्र विक्रेता, अप्पा बळवंत चौक, पुणे

फोटो ओळ

फोटो ः ७६९८२

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26733 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..