भंडारा डोंगरावर अवतरली आषाढी एकादशीनिमित्त पंढरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारा डोंगरावर अवतरली
आषाढी एकादशीनिमित्त पंढरी
भंडारा डोंगरावर अवतरली आषाढी एकादशीनिमित्त पंढरी

भंडारा डोंगरावर अवतरली आषाढी एकादशीनिमित्त पंढरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः आषाढी एकादशीच्या पर्वकाळावर संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी क्षेत्र भंडारा डोंगरावर पिंपरी-चिंचवड आणि मावळ पंचक्रोशीतील पंढरपूर वारी न गेलेल्या हजारो भाविकांनी तुकाबोरायांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. हरिनामाचा दिवसभर जयघोष अन् तुकोबारायांच्या मंदिराला केलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीमुळे भंडारा डोंगरावर पंढरी अवतरली होती.

मंदिरात नैमित्यिक पूजा करण्यात आल्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. सकाळी दहा ते बारा दरम्यान मनोहरपंत ढमाले महाराज यांचे कीर्तन झाले. दिवसभर पाऊस असतानाही भाविकांची गर्दी कमी झाली नाही. भाविकांनी रांग लावून दर्शन घेतले. श्री विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम महाराज, भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने भाविकांना फराळाचे प्रसाद वाटप सुरू होते, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.

भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरावर आषाढी एकादशीनिमित्त पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक किरण आहेर यांनी आकर्षक सजावट केली होती. त्यामुळे मंदिराला मनोहारी रुप प्राप्त झाले होते. अनेक भाविकांनी येथे छायाचित्रे काढून घेतली.
-----------------------------------
भंडारा डोंगर ः आषाढी एकादशीनिमित्त तुकोबारायांच्या मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27071 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top