फुलांचा बाजार दुपटीने वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलांचा बाजार दुपटीने वाढला
फुलांचा बाजार दुपटीने वाढला

फुलांचा बाजार दुपटीने वाढला

sakal_logo
By

फुलांचा बाजार दुपटीने वाढला
पिंपरी, ता. १२ : गुरुपौर्णिमेनिमित्त पिंपरी फुलबाजार चांगलाच बहरला आहे. फुलांना मागणी वाढली असून, दुपटीने फुलांनी भाव खाल्ला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे फुलबाजाराला चांगलाच फटका बसला होता. दोन वर्षानंतर गुरुपौर्णिमा शहरात मोठ्या उत्साहाने ठिकठिकाणी साजरी होत आहे. परिणामी, गेल्या दोन दिवसांपासून फुलांचा बाजार तेजीत असून, पिंपरी बाजारात आवकदेखील मोठ्या प्रमाणात झाली आहे.

शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच मंदिरामध्ये गुरुजनांचा सन्मान व पूजा करण्यासाठी फुलांना चांगली मागणी असते. सकाळपासूनच फुले खरेदीसाठी बाजारात गर्दी होते. सध्या किरकोळ फूल विक्रेत्यांची संख्या २७ आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात फुलांना मागणी वाढल्याने शेतकरी व पर्यायाने फूल विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुट्ट्या गोंड्याला म्हणजेच लाल व पिवळ्या झेंडूला सर्वाधिक मागणी आहे. त्या तुलनेत ओल्या गोंड्याची मागणी कमी आहे. सुट्ट्या गोंड्याचा बाजार ६० रुपयांना, तर ओल्या गोंड्यांचा बाजार ८० रुपयांप्रमाणे सुरू आहे.

शहरातील मंदिरांच्या सजावटीसाठीदेखील गुलाब, शेवंती, तसेच जरबेरा आदी जातींच्या विविध फुलांना मागणी आहे. सध्या बाजारात मोगऱ्याचे प्रमाण कमी आहे. सध्या ४०० ते ५०० रुपये किलोप्रमाणे मोगरा आहे, तर शेवंती १०० ते १२० रुपये किलो आहे. त्याचेदेखील प्रमाण अत्यल्प आहे. पावसामुळे सर्वाधिक बाजारात सध्या झेंडू व गुलछडीचे प्रमाण वाढले आहे. त्यास सर्वाधिक मागणी असल्याची माहिती फुलबाजारचे प्रमुख राजकुमार मोरे यांनी दिली.
---
फुलांचा बाजारभाव : किलोमध्ये
पिवळा झेंडू : ७० ते ८०
लाल झेंडू : ६० ते ८०
गुलछडी : १५० ते २००
साधा गुलाब : ३० ते ४०
तुकडा गुलाब गड्डी : २० ते ३०
सुट्टा गुलाब : २००
डच गुलाब गड्डी : १२० ते १५०
जरबेरा : ४० ते ६०
अस्टर गड्डी : २५ ते ३०
----
- पावसाला सुरुवात झाली आहे. फुलांची आवक समाधानकारक आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बाजार बहरलेला आहे. शेतकरी व विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. फुलांच्या दरात वाढ झालेली आहे.
- राजू शिंदे, उपबाजार विभाग प्रमुख, पिंपरी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27210 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..