महिला आयोगाद्वारे पिंपरी चिंचवडला २१ जुलै रोजी जनसुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला आयोगाद्वारे पिंपरी चिंचवडला २१ जुलै रोजी जनसुनावणी
महिला आयोगाद्वारे पिंपरी चिंचवडला २१ जुलै रोजी जनसुनावणी

महिला आयोगाद्वारे पिंपरी चिंचवडला २१ जुलै रोजी जनसुनावणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : राज्य महिला आयोगाच्या महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत १९, २० व २१ जुलै रोजी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावण्या घेण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवडची जनसुनावणी २१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, चिंचवड महानगरपालिकेजवळ, पिंपरीत होणार आहे. दुपारी तीन ते पाच या वेळेत पिंपरी-चिंचवड शहरातील आयोगाच्या विषयाबाबत आढावा घेतला जाणार आहे. १९ जुलै रोजी पुणे शहरची तर २० जुलै रोजी पुणे ग्रामीण जनसुनावणी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे. दुपारी तीन ते पाच या वेळेत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तत्काळ मदत व्हावी, कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या मांडता यावी, यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाव्दारे या जनसुनावणीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी दीपा ठाकूर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27738 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top