शिष्यवृती परीक्षा ३१ जुलै रोजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृती परीक्षा ३१ जुलै रोजी
शिष्यवृती परीक्षा ३१ जुलै रोजी

शिष्यवृती परीक्षा ३१ जुलै रोजी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. सध्या शहरात शाळा पावसामुळे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. पाचवी आणि आठवीची बुधवारी (ता.२०) होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा ३१ जुलै रोजी होणार आहे. शहरातून ११ हजार ३५५ मुलांनी नोंदणी केली होती.
दरवर्षी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला लाखो विद्यार्थी नोंदणी करतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवी आणि आठवीची २० जुलै रोजी राज्यभरात ही परीक्षा होणार होती. मात्र, अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्याने आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचायला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा आता ३१ जुलै रोजी घेतली जाणार आहे. शहरातून ४९ परीक्षा केंद्रातून पाचवीचे सात हजार ९४ तर आठवीचे चार हजार २६१ विद्यार्थी परीक्षा ३१ केंद्रातून देणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.

अशी केली होती तयारी
शहरात ८० केंद्रातून शिष्यवृत्ती परीक्षा होणार होती. त्या परीक्षेसाठी ८० केंद्र संचालक, ५७८ पर्यवेक्षक आणि १५५ शिपाई अशी स्टाफची नियोजन केले होते. १५० गुणांची परीक्षा असणार असून, आठवीच्या मुलांनी १५ प्रश्‍नांचे उत्तरांसाठी दोन पर्यायांना गोल करायचा आहे, असा बदल यावर्षी करण्यात आल्याचे शिष्यवृत्ती समन्वयक सुभाष सूर्यवंशी यांनी सांगितले.

इयत्ता ः विद्यार्थी संख्या ः परीक्षा केंद्र
-पाचवी - ७ हजार ९४ - ४९
-आठवी - ४ हजार २६१ -३१

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28030 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top