पिंपरी-चिंचवड शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत; हेल्पलाइन जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pawana River Water Level Increase
पाऊस कोसळतोय; जनजीवन विस्कळित

पिंपरी-चिंचवड शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत; हेल्पलाइन जाहीर

पिंपरी - शहर परिसरासह मावळातही गुरुवारी (ता. १४) दिवसभर पाऊस सुरूच होता. कधी संततधार तर कधी जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळांना तीन दिवस सुटी जाहीर केली आहे. मात्र, नोकरदार व व्यावसायिकांनी कामावर अथवा दुकानांमध्ये जाण्यासाठी दुचाकीऐवजी चारचाकींच वापर केल्याने तुलनेने रस्त्यावर दुचाकी कमी दिसल्या. मात्र, खड्डे, खडी आणि साचलेले पाणी असेच चित्र प्रत्येक रस्त्यांवर होते. दरम्यान, महापालिकेने आपत्ती निवारण कक्ष सुरू केला असून हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत.

महापालिकेकडून व्यवस्था

वाल्हेकरवाडी येथील जाधवघाट परिसरातील नदीकाठच्या १५ व्यक्तींना रावेत येथील महापालिका शाळेत स्थलांतरीत केले आहे. त्यांना जेवण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पिंपरीतील संजय गांधीनगर व परिसरातील ३० कुटुंबांच्या स्थलांतराची तयारी केली आहे. दापोडीतील नदी काठच्या नागरिकांची व्यवस्था स्वामी विवेकानंद शाळेत केली आहे. अन्य शाळांमध्येही वीज, पाणी व संभाव्य स्थलांतरितांसाठी भोजन व्यवस्था केली आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिकेची यंत्रणा सतर्क आहे. नदीकाठच्या भागातील संभाव्य पूर परिस्थिती विचारात घेऊन तेथील नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांसाठी सर्व क्षेत्रीय कार्यालय व सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत.

- राजेश पाटील, आयुक्त, महापालिका

आपत्ती निवारण हेल्पलाइन

कार्यालये संपर्क क्रमांक

अ क्षेत्रिय ०२०-६८३३४०५०, ९९२२५०१४५४

ब क्षेत्रिय ०२०-६८३३४३५०, ९९२२५०१४५६

क क्षेत्रिय ०२०-६८३३४५५०, ९९२२५०१४५८

ड क्षेत्रिय ०२०-६८३३४७००, ९९२२५०१४६०

इ क्षेत्रिय ०२०-६८३३५०९०, ८६०५८२२७७७

फ क्षेत्रिय ०२०-६८३३५३५०, ८६०५४२२८८८

ग क्षेत्रिय ०२०-६८३३५५३२, ७८८७८६८५५५

ह क्षेत्रिय ०२०-६८३३५७५०, ९१३००५०६६६

पूरनियंत्रण कक्ष व अग्निशामक हेल्पलाइन

केंद्र संपर्क क्रमांक

पूरनियंत्रण कक्ष ०२०-६७३३११११, ०२०-६७३३३३३३, ९९२२५०१४५१, ९९२२५०१४५२

अग्निशामक केंद्र १०१, ०२०-२७४२३३३३, ०२०-२७४२२४०५, ९९२२५०१४७५, ७०३०९०८९९१

भोसरी ७०३०९०८९९२, ८६६९६९२१०१, ९९२२५०१४७६

प्राधिकरण ०२०-२७६५२०६६, ९९२२५०१४७७

रहाटणी ८६६९६९३१०१, ७०३०९०८९९४, ९९२२५०१४७८

चिखली ०२०-२७४९४८४९, ७०३०९०८९९५, ८६६९६९४१०१

तळवडे ०२०-२७६९०१०१, ७०३०९०८९९६, ९५५२५२३१०१

थेरगाव केंद्र ७०३०९०७९९९, ७७६८०९०१०१

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28038 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top