अन्नधान्यावरील जीएसटी कर हटवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्नधान्यावरील जीएसटी कर हटवा
अन्नधान्यावरील जीएसटी कर हटवा

अन्नधान्यावरील जीएसटी कर हटवा

sakal_logo
By

शेतकरी व सामान्यांवरील
जिझीयाकर लावण्याचा निषेध
पिंपरी, ता. १५ : जीएसटी कौन्सिल १८ तारखेच्या बैठकीत पाच टक्के जीएसटी अन्नधान्यावर आकारण्याचे प्रस्तावित करीत आहे. वास्तविक कोरोना महामारीनंतर इंधन, सीएनजी, घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. सामान्य ग्राहक महागाईने होरपळला आहे. यापूर्वीच बॅंडेड अन्नधान्यावर जीएसटी लावलेला आहे. यातून कोट्यवधी रुपयांचा महसूल केंद्राला मिळत आहे. शेतकरी व सामान्य ग्राहकांवर जिझीयाकर लावण्याचा हा प्रकार आहे. याविरोधात महाराष्ट्र मर्चंट फेडरेशन व पुणे मर्चंट चेंबर बैठकीत निषेध नोंदविला आहे. याविरोधात देशव्यापी संपात १६ जुलैला सहभागी होणार आहे. याचा परिणाम लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार आहे. हा कर हटविण्याची मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी चिंचवडने केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28084 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top