बिल्डरसह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिल्डरसह सोसायटीच्या 
पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
बिल्डरसह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

बिल्डरसह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : फ्लॅट खरेदी केल्यानंतर ताबा प्रमाणपत्र व भोगवटा प्रमाणपत्र न देता फ्लॅटधारकाची फसवणूक केली. तसेच उपनिबंधक कार्यालयास खोटी माहिती पुरवून सोसायटी स्थापन केली. याप्रकरणी बिल्डरसह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिल्डर सुरेश गामी, सोसायटीचा खजिनदार अजिंक्य ताम्हाणे, अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सचिव सचिन साळुंके, सदस्य संदीप वामन, वसूल व इतर पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गामी ग्रुपचे बिल्डर सुरेश गामी याच्या भोसरीतील इंद्रायणीनगर येथील तिरुपती चौकातील राधाकृष्ण कॉम्प्लेसमधील ए विंगमध्ये फिर्यादी यांनी फ्लॅट खरेदी केला. त्यानंतर अद्यापपर्यंत ताबा प्रमाणपत्र व भोगवटा प्रमाणपत्र न देता ही इमारत अनधिकृत ठेऊन फिर्यादी यांची ३५ लाखांची फसवणूक केली. इतर आरोपींनी बिल्डरशी संगनमत करून उपनिबंधक कार्यालयास खोटी माहिती पुरवून सोसायटी स्थापन केली. हा प्रकार २०१३ पासून अद्यापपर्यंत घडला. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28116 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top