ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्राह्मण महासंघातर्फे 
गुणवंतांचा सत्कार
ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार

ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे (पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा) दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विधान परिषद सदस्या उमा खापरे यांच्या हस्ते करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.
चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमास पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, ब्रह्मोद्योगचे उपाध्यक्ष राजन बुडूख, प्रमुख सल्लागार पुष्कराज गोवर्धन, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, इनरव्हील क्लबच्या जिल्हाध्यक्ष मुक्ती पानसे, माजी उपमहापौर नगरसेविका शैलजा मोरे, अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते. विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खापरे यांचा व यूपीएससी परीक्षेत देशात २२३ वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल निगडी-प्राधिकरणातील तन्मयी देसाई या विद्यार्थिनीचा विशेष सन्मान केला. सचिन कुलकर्णी यांनी पार्थ कुलकर्णी, पूजा दीक्षित, अनुजा कुलकर्णी, कौशिक आष्टीकर, ओम शेंडे व हर्षा अग्निहोत्री या विद्यार्थ्यांना महासंघातर्फे प्रत्येकी पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करून त्याचे धनादेश दिले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या एका विद्यार्थ्याचा एका वर्षाचा संपूर्ण खर्च महासंघ करणार असल्याचे जाहीर केले. लकी ड्रॉच्या माध्यमातून अकरा भाग्यवान गुणवंत विद्यार्थ्यांना चांदीच्या प्रतिमांचे वितरण केले. दहावी व बारावीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान केले. नरेंद्र चिपळूणकर व मंजिरी सहस्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल कुलकर्णी यांनी आभार मानले.

फोटो ः 77894

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28178 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..