
स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
पिंपरी, ता.१५ ः एसटी महामंडळाच्या विविध सवलती अंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक जुलैपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक होते. त्यामुळे ३० जूनपर्यंत स्मार्ट कार्ड काढून घेणे अनिवार्य होते. मात्र, आषाढी वारीसाठी ज्येष्ठांना त्रास होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह अन्य सवलतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महामंडळाकडून माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून २९ प्रकारांतील विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे पुरस्कार, अधिस्वीकृतीधारक, दुर्धर आजार अशा विविध सवलत धारकांचा समावेश आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी सद्याची प्रचलीत ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येतील. एक सप्टेंबरपासून सध्या प्रचलित ओळखपत्रे प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. आगारातील स्मार्ट कार्ड ज्येष्ठ नागरिकांनी तातडीने नोंदणी करुन घ्यावी.
सरकारकडून वारंवार ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ दिले गेली. गेल्या महिन्यातच अंतिम डेडलाइन होती. मात्र, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करुन घ्यावी.
-अनिक भिसे, आगार प्रमुख
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28344 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..