संगणक शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्मह्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगणक शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्मह्त्या
संगणक शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्मह्त्या

संगणक शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्मह्त्या

sakal_logo
By

इमारतीवरून उडी मारून
तरुणाची आत्महत्या
नोकरी मिळणार नसल्याच्या भीतीतून कृत्य

पिंपरी, ता. १५ : संगणक शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणाकडे चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये कंपनीत नोकरी मिळणार नाही, या भीतीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. ही घटना सूस येथे घडली.
अक्षय अमोल माटेगावकर (वय २१, रा. सुसगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा आई-वडील व बहिणीसह येथे राहत होता. तो संगणक शास्त्राच्या चौथ्या वर्षात शिकत होता. शुक्रवारी (ता. १५) सकाळी अक्षय याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून राहत्या घरातील बाल्कनीतून उडी मारली. ही घटना सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये त्याला कंपनीत नोकरी मिळणार नाही, या भीतीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन, विच्छेदनासाठी औंध रुग्णालयात पाठवला. अक्षयचे आई-वडील दोघेही अभियंता असून, बहीणही उच्च शिक्षण घेत आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------------------------------
------------------
फोटो ः 78009

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28408 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..